वरणगाव- जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ व भुसावळ तालुका कुस्तीगीर संवाच्या मान्यतेने वरणगाव शहरात कुस्त्यांची भव्य आम दंगल रविवार, 10 रोजी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, चंद्रकांत बढे, सुधाकर जावळे, प्रदीप भोळे, नारायण जैसवाल, समाधान महाजन, राजेंद्र चौधरी, अशोक कडलग, पहेलवान नामदेव मोरे, पहेलवान सुपडू सोनवणे, पहेलवान दिलीप मराठे, प्रशांत निकम, पहेलवान एकनाथ भोई, पहेलवान ईस्माईल शेख आदी उपस्थितीत राहणार आहे. जिल्हाभरातील मल्लांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजन कमेटीतर्फे संजय बावस्कर, महेश सोनवणे, पवन माळी, श्रीराम भोई, गणेश कोळी यांनी केले आहे.