भुसावळ : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचारी वैभव दीपक माळवदकर (39) यांनी आपल्या राहत्या घरात गुरुवारी दुपारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. वैभव मालवदकर हे आपल्या परीवारासोबत निर्माणी वसाहतीमधील क्वार्टर नं 196/बी.एम.मध्ये वास्तव्यात होते. गुरुवारी दुपारी आपल्या कुटुंबासोबत दुपारचे जेवण झाल्यानंतर दुसर्या खोलीत जाऊन त्यांनी दार बंद केले व बराच वेळेनंतर ते दार का उघडत नाही? म्हणून त्यांच्या पत्नीने शेजारी राहणार्यांच्या मदतीने घराचे दार उघडले असता माळवदकर यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली तर त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत वरणगाव पोलिसात मीना वैभव मालवदकर यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नरसिंग चव्हाण करीत आहेत. मयत वैभव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.