वरणगाव ग्रामीण रुग्णालयास डॉक्टरांची तात्पुरती मलमपट्टी

0

वरणगाव। गेल्या दहा दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनी व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी रुग्णालयाला कायमस्वरुपी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी रुग्णालयात तात्पुरते काम बंद आंदोलन छेडण्यात आले होते. वेळीच जळगाव जिल्हा वारिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्य लक्षात घेवून वरणगाव ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर तर मिळालेच नाहीच. पण आळीपाळीने व तात्पूरती मलम पट्टी करणारे डॉक्टर मिळाल्याने दुधाची ताहान ताकावर भागविल्याचे समाधान नागरीकांमध्ये दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनावर फिरले पाणी
येथील ग्रामीण रुग्णालयाचे दुर्दैव गेल्या अनेक महिन्यापासून डॉक्टर नसल्यामुळे जिल्हाभरात चर्चेचा विषय बनलेला आहे. मात्र प्रशासनाला अजूनही जागा येत नसल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉक्टर एसआर भामरे यांनी रुग्णालयाला भेट दिली असता सर्वपक्षीय कार्यकर्त्यां समक्ष चर्चा करुन कायमस्वरुपी आठ दिवसात दोन वैद्यकीयांची तडकाफडकी नियुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या आश्वासनावर पाणी फिरून फक्त रुग्णालयात आळीपाळीनुसार जिल्हयातील डॉक्टरांची चार, चार दिवसाची सेवा लावून देण्यात आली आहे. डॉक्टर नियुक्ती डॉ. हर्षल चॉदा, डॉ. एससी पाथरवट, डॉ. शरद पाटील, डॉ. किरण सोनवणे, डॉ. प्रदिप पाटील, डॉ. पंकज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. सुरेश पाटील, डॉ. स्नेहलकुमार भामरे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. वैशाली चॉदा, डॉ. जयश्री पाटील, डॉ. तृप्ती पाटील यांची वरणगाव ग्रामीण रूग्णालयात आळीपाळीने चार-चार दिवसांची सेवा देण्याचे निश्चित केले आहे. वरणगावकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ प्रशासनाने सुरु ठेवला आहे. येथील ग्रामीण रुग्णल्याचे वैद्यकीय अधिकारी हजर होत नाही. राजीनामे देईल पण वरणगावला जाणार नाही, अशी भूमिका घेण्यामागचे कारण काय? याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णांशी जीवघेणा खेळ सुरुच राहील.