वरणगाव- शहरातील आठवडे बाजारात वाहन बाजुला करण्याच्या वादावरून 12 रोजी दोन गटात दंगल उसळली होती. या प्रकरणी पसार असलेल्या नगरसेवक योगेश उर्फ गणेश आत्माराम धनगरसह आठ आरोपींना मंगळवारी अटक केल्यानंतर बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मंगळवारी नगरसेवक गणेश धनगर यांच्यासह जितेंद्र काशिनाथ काळे, जितेंद्र दशरथ मराठे, संतोष सोपान पाटील, आकिल इकबाल खान, जुबेरखान हैदरखान, मो.अकिल मो.वकिल हे वरणगाव पोलिसांना शरण आले होते. बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी करीत आहेत.