वरणगाव नगरपरिषदेतर्फे शहरात करवसुलीसाठी चार पथकांची नियुक्ती

0

वरणगाव । शासनाच्या धोरणानुसार आर्थिक वर्ष अखेरीपर्यंत कराच्या रक्कमा भरून घेण्यासाठी नगरपरीषदेच्या वतीने धडक मोहीम राबविली जात आहे. पावणेतीन कोटी रूपये थकबाकी कर भरणा करुन घेण्यासाठी चार पथकांची नेमणुक करण्यात आली असुन धडक कारवाई करण्याचा इशारा पालिकेकडून दिला आहे. शहरातील बरेचसे नागरीक या मोहीमेला प्रतिसाद देत असुन वसुली देखील सुरू आहे.

बहुतांश नागरिकांवर वर्षानुवर्षापासून कराची थकबाकी
नगरपरिषदेकडून कर आकारणीच्या रकमेची पावती प्रत्येकाला देण्यात आल्या आहेत. चालु वर्षाची 1 कोटी व पावणेतीन कोटी थकबाकी अशी एकुण पावणे चार कोटी रूपये वसुली या वर्षात करावयाची आहे. यापैकी आजपर्यंत एक कोटीची वसुली पालिकेने केली आहे. मात्र शासनाच्या आदेशानुसार शंभर टक्के कर वसुलीचे पत्र आले आहे. यासाठी पालिकेचे सुरेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र चार पथकाची नेमणुक करून शहरात कर वसुली केली जात आहे. बरेचसे करदाते आहेत की, त्यांच्याकडे वर्षेनुवर्ष कर थकला आहे. परंतु कर भरत नाही अशा करदात्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

कर त्वरीत भरण्याचे पालिकेचे आवाहन
यासाठी वेळ प्रसंगी पाण्याचे जोडणी तोडणे, जप्तीची कार्यवाही करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा वर्तमानपत्रामधून त्यांची नावे व रक्कम जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे ही कटुता टाळण्यासाठी नागरीकांनी सहकार्याच्या भावनेतुन शहराच्या विकासाला हात भार लागावा यासाठी आपल्याकडी कर त्वरीत भरण्याचे आवाहन पालीकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पालिकेत केली सुविधा
शहरात प्रत्येक प्रभागात घरोघरी अथवा दुकानापर्यंत पोहचण्यासाठी व वसुलीसाठी चार पथके तयार करण्यात आली आहे. या चार पथकामधे सहा कर्मचार्‍याचा सामावेश असुन याचे नेतृत्व सुरेश शेळक हे करीत आहे. थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्यास दोन ते चार दिवसाचा कालावधी दिला जातो. यानंतर प्रथम त्यांचे नळ कनेक्शन कापण्यात येत आहे. त्याच प्रमाणे कर भरण्याची सुविधा पालीकेत देखील करणयात आली आहे.

येत्या पंधरा दिवसात हे पावणेतीन कोटी वसुल करण्याचे आवाहन पालीकेसमोर आहे. यासाठी जे थकबाकीदार असतील त्यांची नावे त्यांच्या प्रभागात बॅनरवर लावणे, वर्तमानपत्रातून प्रसिध्दी देण्यात येणार आहे.