वरणगाव नगरपरीषदेच्या विशेष सभेत पाणीटंचाईबाबत आढावा

0

बोअरवेलसह कुपनलिका होणार ; महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन मशीन बसणार

भुसावळ- वरणगाव नगरपरीषदेची पाणीटंचाईबाबत विशेष सभा बुधवारी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विशेष सभेत वरणगाव शहरासाठी नवीन कुपनलिका तसेच बोअरवेल करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली तसेच कठोरा जॅकवेल येथे तापी नदी पत्रात आवर्तनअभावी पाणीटंचाई उद्भवणार असल्याने तापी नदी पत्रात तरंगणार्‍या पाणबुडीवरची 15 हॉर्सपावरच्या दोन पंप मशनिरी बसवण्याचा व ट्यूबवेल दुरुस्ती करणे तसेच उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करणे व 14 व्या वित्त आयोगांतर्गत महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाजवळ सॅनेटरी नॅपकीन मशीन बसवण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली.

यांची सभेला होती उपस्थिती
उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी बबन तडवी, नगरसेविका माला मेढे, नसरीनबी कुरेशी मेहनाजबी पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, अरुणा इंगळे, वैशाली देशमुख, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, विष्णू खोले, बबलू माळी, गणेश धनगर, सुधाकर जावळे यांची प्रमुख उपस्तिथी होती. सभेसाठी लिपिक संतोष वानखेडे, गंभीर कोळी, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, भैयासाहेब पाटील, अधीक्षक प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.