वरणगाव नगरपरीषदेतर्फे पाच घंटागाड्यांचे लोकार्पण

0

वरणगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ अभियांनातंर्गत वरणगाव नगरपरीषदतर्फे 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून 70 लाख रुपये किमतीच्या पाच घंटागाड्यांचे लोकार्पण जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्याहस्ते गुरुवारी करण्यात आले. प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे , उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी बबन तडवी, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य अजित पवार आदी उपस्थित होते.

शहरातील कचर्‍याची लागणार विल्हेवाट
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहर पुन्हा उभे राहत असून शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लागावी या दृष्टीकोनातून पाच घंटागाड्या जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या निधीतून घेण्यात आल्या व या घंटागाड्यांमुळे शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावता येणार आहे तसेच या घंटागाड्यांमध्ये सुका कचरा व ओला कचरा टाकावा व ओल्या कचर्‍यापासून खत तर कोरड्या कचर्‍याचापुनर्वापर करणे शक्य होणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. प्रास्ताविक बांधकाम अभियंता गणेश चाटे यांनी केले.

यांची होती उपस्थिती
नगरसेविका अरुणा इंगळे , प्रतिभा चौधरी, रोहिनी जावळे, जागृती बढे, शशी कोलते, माला मेढे, मेहनाज बी.पिंजारी, नगरसेवक बबलू माळी, राजेंद्र चौधरी, संजीव कोलते, समाधान चौधरी, ईरफान पिंजारी, अल्लाउद्दीन शेठ, ज्ञानेश्वर माळी, गंभीर माळी, सोपान माळी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पालिकेच्या कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. आभार संजय माळी यांनी मानले.