वरणगाव नगरपालिका सभागृहात रोजा इफ्तार

0

वरणगाव। येथील नगरपालिकेतर्फे रोजा इफ्तार कार्यक्रम सांयकाळी घेण्यात आला. पालिका सभागृहात रोजे इफ्तार कार्यक्रमात मुक्ताईनगरचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे, वरणगाव पोलिस ठाण्याचे एपीआय जगदीश परदेशी, पीएसआय निलेश वाघ, नगराध्यक्ष अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुनील काळे, जेष्ठ कार्यकर्ते शेख अलाउद्दीन, अश्याक काझी, नगरसेविका रोहीणी जावळे, शेख कलमोउद्दीन, इफ्तेखार मिर्जा आदी नगरसेवक, नगरसेविका व हिदु मुस्लिम बांधव उपस्थित होते.

पोलिसांना सूचना द्यावी
यावेळी रोजा इफ्तार कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सर्व धर्मियांमध्ये सलोखा ठेवण्याचे आवाहन केले तसेच सोशल मिडीमावर वायरल झालेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, अनुचित प्रकार आढळल्यास पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले.