भुसावळ- तालुक्यातील तळवेल शिवारातील बोहर्डी गावाजवळ अवैधरीत्या गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहा.निरीक्षक जगदीश परदेशी यांच्यासह पथकाने धाड टाकत 31 हजारांचे रसायन नष्ट केले. उपनिरीक्षक निलेश वाघ, हवालदार मेहरबान तडवी, महेंद्र सुरवाडे, गोपाळ पाटील यांच्या पथकाने धाड टाकून एक हजार 600 रुपये किंमतीची गावठी दारू व 30 हजारांचे दारू बनवण्याचे रसायन नष्ट केले. पोलिसांना पाहिल्यानंतर आरोपी पसार झाले. महेंद्र सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी संदीप सुभाष शिंन्दे, अशोक सोपान पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.