सांडपाणी प्रकल्पाच्या निधीचा अपव्यय करणार्यावर कार्यवाही होणार
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव पालिकेच्या सभेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत वरणगाव शहरात तीन कोटींचा प्रकल्प पूर्ण झाला असून चुकीच्या पद्धतीने व अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे जिथे गटारीची आवश्यकता नाही तिथे चांगल्या गटारी तोडून नवीन गटारी बांधण्यात आल्याने शासन निधीचा अपव्यय झाल्याने यास जवाबदार असणार्यांवर कार्यवाही करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला तसेच शहर विकासाच्या 73 विषयांना सभागृहाने शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी दिली. प्रसंगी पालकमंत्रीपदी निवड झालेल्या गिरीश महाजन यांच्यासह नूतन खासदार रक्षा खडसे व नूतन खासदार उन्मेष पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
यांची बैठकीला होती उपस्थिती
नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, मुख्यधिकारी बबन तडवी, अभियंता गणेश चाटे, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी ईरफान पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, नगरसेविका अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, वैशाली देशमुख, नगरसेवक रवींद्र सोनवणे, गणेश चौधरी, नितीन माळी, विकिन भंगाळे, गणेश धनगर, स्वीकृत नगरसेवक सुधाकर जावळे, डॉ.विनोद हरी चौधरी उपस्थित होते .
शहर विकासाच्या 73 विषयांना मंजुरी
शहरात महिलेच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी न्यापकीन मशीन लावणे, शहरातील कचरा घरोघरी जावून गोळा करणे तसेच भोगावती नदी खोलीकरण करणे आदी 73 विषयांना मंजुरी देण्यात आली. रेल्वे स्टेशन ते बसस्टँड रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरवात करण्यात यावी तसेच शहरातील राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे उभारले असून त्यांची देखभाल-दुरूस्तीसाठी पुतळा समिती गठीत करावी, गो शाळेला जागा देणे, महानुभाव पंथाच्या स्मशानभूमीसाठी जागा देणेबाबत चर्चा करण्यात आली. यभा लिपिक संतोष वानखेडे, संजीव माळी यांनी सहकार्य केले.