ओल्या कचर्यावर प्रक्रिया ; प्रशिक्षणानंतर बेरोजगार चालवणार प्रकल्प
वरणगाव : पालिकेतर्फे ओल्या कचर्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. विशेष बाब म्हणले बेरोजगारांना प्रशिक्षण दिल्यानंतर हा प्रकल्प चालवायला देण्यात येणार आहे. कचर्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करून कंपोस्ट पीट बांधण्यात आले आहे. शेण व बायोक्लचर वापरून खत निर्मिती केली जात आहे. निर्माण झालेल्या खताची विक्री महिला बचत गटांना केली जाणार आहे.
अभियानात सहभागाचे आवाहन
नागरीकांनी घरातील ओला कचरा गट नंबर 450 / 451 ( विकास कॉलनी सिनेमा टाकी रोड) या ठिकाणी द्यावा तसेच अभियानात सहभागी होवून नगरपरीषदेस सहकार्य करावे, असे आवाहन वरणगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे. पालिकेने उघड्यावर कचरा फेकणार्या व्यापारी व नागरीकांना दंड केला आहे त्यामुळे कुणीही नियमांचे उल्लंघण करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.