वरणगाव पालिकेला मिळाले पूर्णवेळ मुख्याधिकारी ; बबन तडवींनी पदभार स्वीकारला

0

वरणगाव- वरणगाव पालिकेसाठी चोपड्याचे मुख्याधिकारी बबन तडवी यांची नियुक्ती करण्यात आली असून शनिवारी त्यांनी पालिकेत येवून पदभार स्वीकारला. प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले.

जलसंपदा मंत्र्यांनी पाळला शब्द
वरणगाव पालिकेत कायमस्वरूपी मुख्यधिकारी नसल्याने विकासकामे करतांना मोठ्या अडचणी येत होत्या शिवाय अन्य पदेदेखील भरली जात नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह शिष्टमंडळाने याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करून समस्या सोडवण्याची मागणी केली होती. मंत्री महाजन यांनी नगरविकास विभागाची बैठक 28 नोव्हेंबर रोजी घेवून तातडीने मुख्याधिकार्‍यांसह रीक्त पदे भरण्यासंदर्भात नगरविकास विभागाच्या प्रधानसचिव मनीषा म्हस्कर व नगरविकास विभागाचे आयुक्त कृष्णा मथुन व उपसंचालक डी.पी.मोरे यांना निर्देश दिले होते. आठ दिवसांच्या आत वरणगावात मुख्याधिकारी न मिळाल्यास मंत्रालयात आत्मदहनाचाही इशारा दिला होता. यावेळी प्रधान सचिव मनीषा म्हस्कर यांनी मंत्री महाजन यांना वरणगावला मुख्यधिकारी व बांधकाम अभियंता व इतर रीक्त पदे आठ दिवसांच्या आत भरण्याचा शब्द मंत्र्यांना दिले होते. प्रधान सचिवांनी

यांची होती उपस्थिती
नूतन मुख्याधिकार्‍यांचा सत्कार नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका मालामेढे, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, अरुणा इंगळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, गणेश चौधरी, विष्णू खोले, रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, साजीद कुरेश, ईरफान पिंजारी आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.