वरणगाव पोलिस स्टेशनला प्रथमच महिला अधिकारी रुजू

0

वरणगाव- वरणगाव पोलिस स्टेशनच्या स्थापनेपासून प्रथमच महिला पोलिस अधिकारी महणून सारीका कोडापे यांची बदली आहे. वरणगाव पोलिस ठाण्याचा 15 दिवसांपूर्वीच पदभार घेतलेल्या सचिन सानप यांची पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. कोडापे यांनी पदभारी स्वीकारला आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव, जळगाव या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. वरणगावात ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठा आपला प्रयत्न राहणार असून अवैध प्रकारांना निश्‍चितच आळा बसवू, असे त्या म्हणाल्या.

सानप यांना पुन्हा वरणगाव आणण्यासाठी प्रयत्न -नगराध्यक्ष
एपीआय सचिन सानप यांची राजकीय हेतूने बदली करण्यात आली असून त्यांना पुन्हा वरणगाव पोलिस स्टेशनला रूजू करावे, अशा मागणीचे पत्र वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास नागरीकांसह नगराध्यक्ष यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.