महापुरूषांच्या छायाचित्रामुळे प्रवाशांकडून शिस्तीसह स्वच्छतेबाबत कटाक्षाने काळजी
भुसावळ- वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील प्रवासी निवार्यात महापुरूषांची छायाचित्रे लावण्यात आली असून प्रवाशांनी या उपक्रमाचे कौतुक करीत शिस्तीसह स्वच्छतेबाबत काळजी घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. नागरी वसाहतीला लागून असलेल्या बसस्थाबा क्रमांक दोन म्हणून त्याची ओळख आहे.
प्रवाशांकडून शिस्ती सोबतच स्वच्छतेची काळजी
गेल्या अनेक दिवसांपासून वरणगाव फॅक्टरी प्रशासनाने प्रवासी निवारा स्थानक फारच कल्पकलेने बनविले आहे. या प्रवासी स्थानकाचा आकार सावलीची व्यवस्था, पावसाच्या पाण्यापासून प्रवाशांचा बचाव बैठक आसनव्यवस्था उत्कृष्ट पद्धत्तीने करण्यात आली आहे. प्रवाशांसह कर्मचारी, विद्यार्थी, नागरीक व प्रवाशांना महापुरुषांचे स्मरण व्हावे, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महर्षी स्वामी विवेकानंदन यांचे छायाचित्र उत्कृष्ठ रीतीने लावण्यात आले आहे. या गोष्टीचा परिणाम होऊन या स्थानकावर प्रवाशांकडून शिस्त तर पाळलीच जाते शिवाय स्वच्छतादेखील राखली जात आहे.