वरणगाव येथे आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धा

0

वरणगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वरणगाव येथे आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पधेचे आयोजन 5 रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपक मराठे यांचे हस्ते बजरंग बली यांच्य प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अनंतराज पाटील कार्यकमाचे अध्यक्षस्थानी होते. मल्लखांब स्पधेमध्ये राजेंद्र भोई, ललित अमोदकर, राहुल भोई, अंकुश मराठे, हेमराज मगरे आदी विद्यार्थ्यांची विभागीय स्पधेसाठी निवड करण्यात आली.

यांनी पाहिले काम
परिक्षक म्हणून महात्मा गांधी विद्यालयाचे प्रा. जयंत जोशी यांनी काम पाहिले. कार्यकम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य दिनू पाटील, प्रा. बी.बी. पाटील, प्रा.डॉ. राहुल संदानशिव, कर्मचारी रवि पाटील, अतुल शेठे, अविनाश पाटील, नितीन चौहान, एस.डी. पाटील, राहुल ठाकूर, छोटू भोईटे, सुनिल गुरचळ आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यकमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. सुभाष वानखेडे यांनी केले.