वरणगाव येथे जैन मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा

0

वरणगाव : येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंडळातर्फे 6 ते 12 जानेवारी दरम्यान मंदिराचा जिर्णोध्दार व नूतन जिनबिंब पंचकल्याणक महामहोत्सव तपतकठोरा रोड, रावजी बुवा परिसरात आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यकमात वात्सल्यरत्नाकर स्वात्मनंदिजी महाराज यांचे सानिध्य लाभणार असून खासदार रक्षा खडसे, आमदार पांडुरंग फुंडकर, आमदार एकनाथराव खडसे, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय सावकारे, आकाश फुंडकर, रोहिणी खडसे-खेवलकर, दिलीप घेवारे, निता घेवारे, रोहित भोपाल, चक्रेश जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. पार्श्वनाथ दिंगबर जैन मंडळाने सतत प्रयत्नशील राहून 3 वर्षात एक सभागृहात व वरच्या मजल्यावर 1008 भगवान चंद्र प्रभ जिनमंदिर बांधून पूर्ण केलेले आहे. पार्श्वनाथ क्षेत्रपाल भगवान व माता पद्मावती यांच्या मुर्तीची हत्ती व सुवर्ण रथावरून मिरवणूक काढण्यात येईल. यानंतर गर्भ, जन्म, तप, ज्ञान व मोक्ष अशा पंचकल्याणद्वारे स्थापना करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी जैन मंडळाचे अध्यक्ष अनिल जैन, मधूकर कारंजकर, चंद्रशेखर अवतारे, सुधाकर कारंजकर, धर्मनाथ सैतवाल, विजय जैन, संजीव अवतारे, सुधिर कारंजकर आदी परिश्रम घेत आहे.