वरणगाव – गेल्या दहा दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील रसलपूर येथील तरुण मुबारक तडवी याचा मृतदेह संशयितरित्या वरणगाव शिवारातील भोगावती नदी कडेला असलेल्या शेत विहिरीत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला असता मयताजवळ ओळख पटेल असा कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे.रावेर तालुक्यातील रसलपूर येथील गरीब कुटूंबातील रहिवाशी मुबारक तडवी याची गरीबीची परिस्थिती असल्याकारणाने स्वतः मोलमजूरी करून आपले कुटूंबाचा सांभाळ करुन जळगाव येथील वस्तीगृहात राहून शिक्षण घेत होता. मात्र मुबारक याचा मृतदेह वरणगाव शिवारातील तळवेल येथील शेतकरी विलास बळीराम पाटील यांच्या शेतविहीरीत आढळून आला होता. याप्रसंगी पोलिसांकडे मयताच्या शर्टाच्या खिशावरील व पायातील बुटाच्या नावाव्यतिरिक्त पुराव्यावरुन वरणगाव पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप गागर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निलेश वाघ, गोपनिय खात्याचे सुनिल वाणी, जितेंद्र नारेकर, पठाण यांचे स्वतंत्र पथक तयार करुन रसलपूर येथे तपास करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.