वरणगाव रेल्वे स्टेशन ते बस स्टॉप रस्त्याचे काम तातडीने सुरू करा

0

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश : नगराध्यक्ष नगराध्यक्ष सुनील काळेंनी केली होती मागणी

भुसावळ- जिल्हा नियोजन विकास समिती अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभेत वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील नागरीकांच्या जनहिताच्या समस्यांना वाचा फोडली. त्यात नागेश्वर मंदिर ते रेल्वे स्टेशन ते बस स्टॉपपर्यंत दुभाजक टाकून चौपदरी रस्ता मंजूर असून या रस्त्याच्या दुर्दशेने अपघात हेात असून रस्ता कामाला तातडीने सुरूवात करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी रस्त्याच्या कामाला तातडीने सुरूवात करण्याचे आदेश दिले.

विविध समस्यांना नगराध्यक्षांनी फोडली वाचा
शासकीय विश्रामगृहाची जागा ही जिल्हाधिकार्‍यांनी वरणगाव नगरपरीषदेच्या इमारतीसाठी दिली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग ही जागा नगरपरीषदेला देत नाही त्यामुळे जागेचा ताबा द्यावा, बस स्टॉप ते भोगावती नदीपर्यंतच्यारस्त्याच्या विकासासाठी निधी दयावा, ग्रामीण रुग्णालयाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, 4) वरणगाव शहरातून समांतर महामार्गासाठी 70 कोटी मंजूर झाले असून त्यातील 40 कोटी पळवून लावण्यात आल्याने त्याचा शोध घेवून संपूर्ण 70 कोटीतूनच कामे करावीत, वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप यांची राजकीय दबावाखाली झालेली बदली रद्द करावी, वरणगाव शहरात बसस्थानक नाही तसेच पिकअप शेड सुद्धा नाही हा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात यावा व वरणगाव नगरपरीषदेला नगरोत्थान व दलितेतर निधी देताना अन्याय प्रशासनाने केला आहे त्याबाबतीत न्याय द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पालकमंत्री तसेच भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्याकडे केली. वरणगाव शहरातील जनहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना पालकमंत्र्यांनी दिले असल्याचे काळे यांनी कळवले आहे.