वरणगाव शहरात फिरत्या न्यायालयात चार प्रकरणे निकाली

भुसावळ : मुंबई उच्च न्यायालाच्या औरंगाबाद खंडपीठातर्फे तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे शुक्रवारी ‘न्याय आपल्या दारी’ (फिरते न्यायालय) मोबाईल व्हॅनचे आयोजन वरणगावात करण्यात आले. तालुका विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व्ही.सी.बर्डे यााच्या अध्यक्षतेखाली दिवाणी न्यायाधीश के.एस.खंडारे यांच्या उपस्थितीत चार खटले निकाली काढण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
मोबाईल व्हॅन न्यायालयाच्या आवारातून निघाल्यानंतर वरणगाव येथे नेण्यात आली. यावेळी अ‍ॅड.राजेश कोळी, अ‍ॅड.कैझर भारमल, अ‍ॅड.व्ही.के.फिरके, वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, न्यायालयातील कर्मचारी एस.आर.पाटील, डी.ई.बोदडे, एम.आर.चौधरी, प्रकाश सुतार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.एस.जगदाळे यांनी केले. न्यायाधीश के.एस. खंडारे, वकील राजेश कोळी, अ‍ॅड.कैझर भारमल यांनी लोक अदालतीमध्ये तडजोडी बाबत मार्गदर्शन केले.