वरणगाव– पालिकेच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदानातून शहरातील विविध प्रभागात पेव्हर ब्लॉक, रस्ता काँक्रिटीकरण, गटार बांधकाम, रस्ता डांबरीकरण करण्याकरीता दोन कोटी 18 लाख आठ हजार रुपयांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पत्रकान्वये दिली आहे. प्रभाग क्रमांक दोन ते आठमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात येतील तसेच प्रभाग क्रमांक 9 मध्ये रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण , प्रभाग क्रमांक 13 ते 15 मध्ये रस्ता खडीकरणास काँक्रिटीकरण होईल. या या कामाां प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही कामे पालिकेला नगरविकास विभाग, मुंबई यांच्याकडील पत्रानुसार व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पीएमसी यांची नियुक्ती झाल्यानंतर केली जाणार आहेत. ही नियुक्ती करण्याकरीता वरणगाव पालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला आहे. नियुक्तीसाठी नगर परीषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाल्यावर 12 प्रभागात विकासकामांना सुरुवात होईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.