नगराध्यक्ष सुनील काळे : अयोध्यानगरात 34 लाखांच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
वरणगाव- वरणगाव शहरात विकासाची गंगा वाहत असून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असल्याने मनस्वी समाधान आहे. विकासकामांना कुणाची दृष्ट लागायला नको, अशी परमेश्वर चरणीप्रार्थना केल्याचे भावोद्गार नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे काढले. शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील आयोध्या नगरात नगरपरीषदेच्या वतीने नवनिर्मित योजनेतून नॅशनल हायवे ते गजानन पाटील यांच्या घरापर्यंत 34 लक्ष रुपयांच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ वरणगांवचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
कितीही अडथळे आले तरी करणार मात
नगराध्यक्ष काळे म्हणाले की, शहराचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे. कुणी कितीही अडथळे आणले तरी अडथळ्यांवर वरणगांवकरांच्या आशीर्वादने मात करू व सर्व जातीतील लोकांना बरोबर घेऊन वरणगांव शहराचा सर्वांगीण विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. माझे सहकारी उपनगराध्यक्ष शेख अखलाक व सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्यामुळे वरणगांवात विकासाच्या बाबतीत विक्रमी कामे करण्याचे एकच ध्येय व संकल्प असल्याचे काळे म्हणाले. काळे म्हणाले की, शहराचा विकास करताना कुठेही भेदभाव पालिकेच्या माध्यमातून मुळीच होणार नाही याची शास्वती जनतेला देतो. शहराचा चौफेर विकास वेगाने करायचा आहे त्यासाठी जनतेची साथ महत्वाची आहे यासाठी विकासाच्या महायज्ञात वरणगावकरांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी प्रसंगी केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सभापती तथा नगरसेवक विकीपन भंगाळे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण जैस्वाल, सोनवणे गुरुजी, डॉ.राहुल भोईटे, डॉ.पंकज पाटील, प्रदीप भंगाळे, नितीन कापूरे, हितेंद्र झोपे, प्रभाकर झोपे, गोपाळ पाटील, सोनवणे, ठेकेदार एकनाथ पाटील, शेख कलीम शेख, सलीम हिंमत यांच्यासह नागरीक उपस्थित होते.