वरणगाव शहरासह पंचक्रोशीत पावसासाठी महादेव मंदिरात जलाभिषेक

0

भुसावळ- तालुक्यातील वरणगाव शहरासह परीसरात वरुणराजा विपूल प्रमाणात बरसण्यासाठी शहरातील जागृत तीर्थक्षेत्र श्री सिद्देश्‍वर महादेव मंदिरामध्ये मोठा रुद्रभिषेक जलाभेषक व जलाधीवास नगराध्यक्ष सुनील काळे व ज्येष्ठ नागरीकांसह ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
गणपती व महादेवाची आरती यावेळी वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते व विवेक जोशी महाराज, वैभव जोशी महाराज, योगेश जोशी महाराज, विनायक नाईक महाराज, सुदाम बुवा महाराज, तुषार जोशी, सतीश जोशी, राजेश मांडवगणे, गोविंदराव मांडवगणे, चंद्रकांत नाईक, अवधूत मुजूमदार, युवा नेता मनोज भोई, अजय भोई यांच्यासह शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगाव शहर व परीसरात वरुणराजाची कृपादृष्टी होण्यासाठी प्रार्थना केली. प्रसंगी वृक्षारोपण करून पर्यवरणाचे रक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी महादेवाची पिंडीला जलाभिषेक करण्यात आला तसेच पाण्याने मंदिर भरण्यात आले.