वरणगाव- वरणगाव शहर हे हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. शहरातील मुस्लिम व हिंदू समाजाचे बांधव एकमेकांशी सलोख्याने राहत आहेत, असे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. पोलिस स्टेशन व वरणगाव नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन नगरपालिकेत करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुक्ताईनगरचे पोलिस उपविभागीय सुभाष नेवे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे, कवी अ.फ.भालेराव, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, उपनिरीक्षक निलेश वाघ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेठ, मका शेठ , संजीव कोलते , मिलींद मेढे ,पप्पू जकातदार, नगरसेवक राजेंद्र चौधरी , गणेश चौधरी , रविंद्र सोनवणे, राजेश इंगळे , इरफान पिंजारी , साजीद कुरेशी , शामराव धनगर , सुधाकर जावळे आदी मान्यवर उपस्थित होते .
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौलाना हाफीस महेमुद पटेल व मौलवी फिरोज यांनी केले. रोजे इफ्तार पार्टी यशस्वीतेसाठी जावेद शेख, रिजवान खान, कलीम शेख, निजाम शेख, असलम शेख, निजाम काजी, शब्बीर मन्सुरी, सिद्दीक रवान, गफ्फार भाई , इसाम उद्दीन , शेख फय्युम, महेमुदशाहा, फिरोज खान आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार शेख सईद यांनी व्यक्त केले.