नगराध्यक्ष म्हणाले, होय मी महाजन गटाचा ; विषयांना सभागृहाची मंजुरी
वरणगाव– वरणगाव पालिकेत महाजन गटाचे कमळ उमलल्यानंतर नगराध्यक्षपदी सुनील काळे विराजमान झाले होते तर त्यांच्या काळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत गटनेत्याच्या खुर्चीसाठी खडसे गटातील नगरसेवकांनी आग्रह धरल्याने सभागृहात काही वेळ गोंधळ निर्माण झाला मात्र ही बाब न्यायप्रवीष्ट असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. सभागृहात 15 विषयांना मंजुरी देण्यात आली. सभागृहात नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची उपस्थिती होती.