वराडसिम येथे गोसेवा अनुसंधान केंद्राचे भूमिपुजन

0

भुसावळ । तालुक्यातील वराडसिम येथील वाघुर धरण परिसरात गिरी गोवर्धन गौशाला तसेच महावीर कृष्ण गोसेवा अनुसंधान केंद्राचा भूमिपुजन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी गोस्वामी 1008, घनश्याम लालजी महाराज, प्रेमानंद शास्त्री यांच्या हस्ते संपूर्ण विधी पार पडला. याप्रसंगी माजी आमदार सुरेश जैन, आमदार संजय सावकारे, प्रेमचंद कोटेचा, नरेश खंडेेलवाल, युवाचार्य मनिष लुंकड, देवीचंद छोरिया, अजय ललवाणी, नितीन लढ्ढा, अशोक जैन, गोपाल मेहता, शरद कासट, गोवर्धन राठी, ललित कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांनी केले सहकार्य
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जे.बी. कोटेचा, कांतीलाल चोरडिया, गौतम चोरडिया यांसह भगवान महावीर नवयुवा गृपचे कार्यकर्ते संतोष चोरडिया, पारस बेदमुथा, सुरेश देवडा, सुरेश कुमट, सुभाष चोरडिया, अतुल गेेलडा, विनोद चोरडिया, डॉ. कुंदन कोटेचा, नंदलाल मंडलेचा, धरमचंद चोपडा, राजेश बाफना, अमित चोरडिया, योगेश मंडलेचा, विशाल चोरडिया, अशोक दोशी, विजय छाजेड आदींनी सहकार्य केले.