भुसावळ- तालुक्यातील वराडसीम येथील इंदिरा नगर भागात जुगाराचा डाव रंगला असतानाच तालुका पोलिसांनी धाड टाकून झन्नामन्ना खेळणार्या सात जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास करणयात आली. आरोपींच्या ताब्यातून पाच हजार 300 रुपयांची रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शखाली पोलीस निनिरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गजानन करेवार, हवालदार विठ्ठल फूसे, राजू काझी, उमेश बारी आदींच्या पथकाने केली.