वराडसीम विद्यालयाच्या चेअरमनपदी अ‍ॅड.सुरेश झाडखंडे बिनविरोध

0

सचिवपदी शालिक पाटील ; निवडीनंतर पदाधिकार्‍यांचा गौरव

वराडसीम- विद्या प्रसारक मंडळाने चालवलेल्या पंडीत नेहरू विद्यालयाच्या चेअरमनपदी अ‍ॅड.सुरेश जी.झाडखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिवपदी शालिक त्र्यंबक पाटील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाल्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. त्यात उभय पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण एकनाथ वाणी तर उपाध्यक्षपदी अशोक किसन पाटील (सर) हे यापूर्वीच निवडून आले आहेत.

अ‍ॅड.झाडखंडेच्या निवडीने अपेक्षा होणार पूर्ण !
मंडळावर अ‍ॅड.सुरेश जी.झाडखंडे यांची झालेली बिनविरोध निवड ही विद्यालयाच्या उन्नतीसाठी व भरभराटसाठी अति मोलाची ठरणार असून ग्रामस्थांच्या अपेक्षा निश्‍चितच पूर्ण होतील, असा आशावादही निवडीप्रसंगी व्यक्त करण्यात आला. या निवडीप्रसंगी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह संचालक मिठाराम रामू पाटील, दौलत सुरा पाटील, भास्कर चिंधू येवले, श्रीधर अर्जुन ढाके, प्रभाकर विष्णू वाणी, मधुकर तुकडू ढाके, निवृती रामु भारंबे आदींची उपस्थिती होती.

निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी अन् जल्लोष
अ‍ॅड.सुरेश झाडखंडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर गावात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. वराडसीमचे माजी सरपंच विलास पाटील, माजी सरपंच चारूदत्त जंगले, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मावळे, सुभाष कोळी, मंगेश डोळसे, प्रकाश ठाकुर, सुनसगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे, आर.बी.पाटील आदींनी नूतन चेअरमन अ‍ॅड.झाडखंडे यांचा सहृदय सत्कार केला. प्रसंगी सुनील झाडखंडे, अनिल झाडखंडे, राजु जोशी महाराज, धीरज पाटील, दिलीप पाटील, बापु सोनवणे, दीपक झाडखंडे, समाधान देशमुख, नितीन वंजारी, सतीश झाडखंडे, विशाल झाडखंडे हे उपस्थित होते.