वरिष्ठ लिपीकास लाच घेतांना अटक

0

जळगाव। धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीकास तीन हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार रजेचा कालावधी वैध ठरविण्यासाठी व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी धुळे येथील हिरे वैद्यकीय अधिकारी मंडळ यांच्याकडे गेले असता, तपासणीअंती प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडून वरिष्ठ लिपीक हरीश्‍चंद्र शालीग्राम फुलपगारे यांनी पाच हजाराची लाच मागीतली.