वरीष्ठ माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अयोध्यादेवी मंत्री

0

पदग्रहण समारंभ उत्साहात ; विमल काबरा सचिवपदी

भुसावळ- वरीष्ठ माहेश्वरी महिला मंडळाचा पदग्रहण समारंभात मावळत्या अध्यक्षा विजया चांडक यांनी नुतन अध्यक्षा अयोध्यादेवी मंत्री यांना तर सचिव रंजना हेडा यांनी विमल काबरा यांना पदभार सोपवला. माहेश्वरी भवनात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मनोरमा काबरा उपस्थित होत्या.

यांची होती उपस्थिती
पुष्पा हेडा, संतोष हेडा, यशोदा हेडा, सविता दरगड, सुशिलादेवी राठी, वीणा लाहोटी, राधा हेडा, भगवती चांडक, नर्मदा चांडक, शकुंतला हेडा, पुष्पा मंत्री, शोभा काबरा, अरूणा काबरा, निला काबरा, नंदा लढ्ढा, आशा काबरा, लक्ष्मी चांडक, सुषमा झवर, विमल झवर, सरला नागोरी यांच्यासह माहेश्वरी महिला मंडळ व वरीष्ठ माहेश्वरी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शुभांगी हेडा यांनी तर आभार सविता दरगड यांनी मानले.