वरुडे, गाडकवाडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकला

0

राजगुरुनगर । खेड तालुक्यातील मौजे वरुडे ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पाडली. सरपंच पदासह इतर सहा ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. मारुती थिटे हे सरपंच पदावर निवडून आले असून रुपेश तांबे, नकुल (आण्णा) चौधरी, जावेद इनामदार, सुनिता पडवळ, आशा गणेश तांबे, पूनम भुजबळ आदी सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

मौजे गाडकवाडी ग्रामपंचायतीमध्ये ही सरपंच पदासह सात ग्रामपंचायत सदस्य निवडून आणत गाडकवाडी ग्रामपंचायतीवर देखील भगवा फडकलेला आहे. वैभव गावडे हे सरपंचपदी निवडून आले असून काळूराम गाडगे, विशाल गावडे, जयश्री खंडागळे, धनेश सरडे, कल्पना गाडगे, निर्मला रणपिसे व प्रभावती सरडे आदी सदस्यपदी निवडुन आलेले आहेत.

नवनियुक्त सरपंच, सदस्यांचा सत्कार
आमदार सुरेश गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन्ही गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा तसेच मौजे जऊळके बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री सुरेश येवले यांचा सत्कार करण्यात आला. गावातील मुलभूत सेवासुविधांसह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करीत आमदार सुरेश गोरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. संतोष तांबे, ज्ञानेश्‍वर वाघोले, दशरथ चौधरी, साहेबराव तांबे, पोपटराव गोडसे, विलासराव पोखरकर, पांडुरंग वाघोले, अंकुश कातोरे, बाळासाहेब गाडगे, विकास गाडगे यांच्यासह इतर ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.