वरूळ येथे स्वाभिमानी संघटनेचे दुधविक्री बंद तीव्र आंदोलन

0

वरूळ (प्रतिनिधी) – 16 जुलै पासून स्वाभिमानी संघटनेने राज्यात पुकारलेल्या दूधविक्री बंद आंदोलनाच्या अनुषंगाने स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली वरूळ व परीसरातील शेतकर्‍यांनी अंकलेश्वर-बर्‍हाणपूर रस्त्यावर वरूळ येथे तीव्र आंदोलन केले. दूध उत्पादक शेतकर्‍यानां उत्पादन केलेल्या दुधाच्या खर्चाच्या निम्म्या किमतीत दूध विकावे लागतेय.सरकार दुधाच्या भुकटीला 3रुपये अनुदान देत असते.परन्तु दूध उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना एक रुपयाही अनुदान म्हणून देत नाही म्हणून जोपर्यंत सरकार दूध उत्पादक शेतकर्‍याला लीटर मागे 5रुपये अनुदान देत नाही आणि ते अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करत नाही तोपर्यंत दुध विक्री बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला दिला होता .या शेतकर्‍याच्या हितासाठी पूर्ण महाराष्ट्रात पुकारलेल्या दूध विक्रीबंद आंदोलनास स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली वरूळ येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री .सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या आंदोलनावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाई पटेल,रोहित रंधे, देविदास कोळी ,डॉ.चंद्रकांत मराठे, चतुर कोळी, अंतुर्ली येथील दिनेश ईशी, अभिमन ईशी,तर्‍हाडचे जगन कोळी,दिनेश धनराज, गावातील व परिसरातील शेतकरी आंदोलनस्थळी उपस्थित होते.