वर्क ऑर्डर देण्यासाठी 28 लाखांची लाच घेणारा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एसीबीच्या जाळ्यात

28 lakh bribe: Engineer of tribal department in Nashik ACB net नाशिक : आदिवासी भागात मध्यान्ह भोजन (सेंट्रल किचन) कक्ष उभारण्यासाठी (बांधकाम करण्यासाठी) दोन कोटी 40 लाखांची वर्क ऑर्डर देण्यासाठी तडजोडीअंती 28 लाख 80 हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या नाशिक आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागुल (50) याला गुरुवारी लाच स्वीकारताच नाशिक एसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या. या कारवाईने आदिवासी विभागातील लाचखोरांमध्ये भीती पसरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने लाचखोर नाशिक एसीबीच्या जाळ्यात अडकत असल्याने कारवाईचे कौतुक होत आहे.

लाच स्वीकारताच केली अटक
आर.के.इन्फ्रा कॉन्स्ट्रो प्रा.लि. फर्मचे नाशिक जिल्ह्यातील हरसूल मुला-मुलींच्या वसतिगृहात सेंट्रल किचनचे काम सुरू करण्यासाठी लागणारा कार्यारंभ आदेश देण्यासाठी तडजोडीअंती आरोपी दिनेशकुमार बागुल याने 12 टक्क्यांप्रमाणे लाच मागितली होती मात्र तडजोड होवून 28 लाख 80 हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. याप्रकरणी 39 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सापळा रचला. बागुल याच्या निवासस्थानी पैशांच्या देवाण-घेवाणीचे निश्चित झाल्यानंतर लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली. नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वात सापळा यशस्वी करण्यात आला.