पुणे : आज पूर्ण जगात वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जात आहे. प्राचीन काळापासूनच माणूस चित्रांच्या माध्यमातून आपले विचार, व्यवहार, इतिहास आणि समाजिक, राजकीय तसेच आर्थिक स्थिती व्यक्त करत आला आहे. मोठे संकट असो किंवा आनंदाचा क्षण चित्राच्या माध्यमातून उत्तमपणे साकारता येते. पण, आजच्या सोशल मीडियाच्या जगात चित्रांची जागा फोटोने घेतल्याचे पाहायला मिळते. आज फोटो घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे उपलब्ध आहेत. प्राचीन काळी लोक दगडांवर, घरांच्या भिंतीवर, झाडांवर आपल्या कलेचे प्रदर्शन करत.
हा दिवस त्या फोटोग्राफर्सना समर्पित असतो ज्यांनी अनमोल क्षणांना फोटोच्या स्वरुपात कॅमेऱ्यात कैद केले. हा दिवस साजरा करण्यामागे एक जुनी गोष्ट देखील आहे. आजपासून १७९ वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. त्या घटनेच्या आठवणीत हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी प्रत्येक फोटोग्राफरला आपल्या कामावर गर्व असावा असाच आजचा दिवस .