वर्षपुर्तीनिमित्त भाजपतर्फे संपर्क अभियान

0

पंतप्रधान साधणार लाभार्थींशी संवाद

पिंपरी : केंद्र सरकारच्या चतुर्थ वर्षपूर्तीनिमित्त 26 मे ते 11 जून या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टी संपर्क अभियान राबविणार आहे. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारचा 4 वर्षांच्या कालावधीमध्ये सरकारच्या अनेक उपलब्धी परिपूर्ण व लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामन्यांना देणार आहे. सदरच्या अभियानामध्ये राज्यातील मंत्र्यांचा सहभाग राहणार आहे. देशभरात 15 लाभार्थी योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑडियो कॉन्फरन्सद्वारा बोलणार आहेत.

वरिष्ठ कार्यकर्त्यांचे गट
याकरिता पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते यांचे गट तयार केले जाणार आहेत. असे गट प्रबुध्द व्यक्तींशी संपर्क करून केंद्र सरकारच्या 4 वर्षांच्या उपलब्धीची माहिती, विविध प्रकारचे साहित्य नागरिकांना देणार आहेत. विधानसभा स्तरावर केंद्र व राज्य सरकारच्या लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. महापुरूषांचे पुतळे व परिसरात एक दिवसाचे स्वच्छता अभियान व महापुरूष पुजनांचे कार्यक्रम राबिवण्यात येणार आहेत. युवा मोचार्र्द्वारा मंडल स्तरावर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

सप्ताहातून एकदा स्वच्छता कार्यक्रम
अभियना दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया व फोटो पक्ष कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. तसेच सप्ताहातून एका दिवशी स्वच्छता कार्यक्रम अभिनव पद्धतीने राबवून जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संपर्क अभियनाचे माध्यमातून शहरामधील नागरिकांना केंद्र सरकारचा 4 वर्षांच्या कालावधीमधील सरकारच्या योजनांचा लाभ देण्याचा निर्धार आमदार लक्ष्मण ज़गताप यांनी केला आहे. त्याप्रकारची जबाबदारी पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते यांना दिली आहे.

अभियानाचे संपर्क प्रमुख जगताप
संपर्क अभियनाचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख म्हणून आमदार लक्ष्मण ज़गताप पाहणार आहेत. विशेष संपर्क अभियानाचे संयोजक ज्येष्ठ नेते आझम पानसरे, आमदार महेश लांडगे, राज्य लेखा परिषदेचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे असणार आहेत. लाभार्थी संमेलन – गोपाळ माळेकर, पत्रकार परिषद – अमोल थोरात, बुध्दीजीवी संमेलन -सारंग कामतेकर, भारती चव्हाण व बाबू नायर, समरसता संपर्क – संजय मंगोडकर व मनोज तोरडमल, स्वच्छता अभियान – एकनाथ पवार, बाईक रॅली – राजेश पिल्ले व रवि लांडगे, वरिष्ठ नागरीक अभियान – महेश कुलकर्णी, बूथ संपर्क अभियान – अमोल थोरात अशाप्रकारे विभागांचे संयोजक असणार आहेत.