भावनगर : लग्नाचे वर्हाड घेऊन निघालेला ट्रक पुलावरून नाल्यात कोसळला. या भीषण अपघातात 30 जण ठार झाले. गुजरातमधील राजकोट-भावनगर राज्य महामार्गावर उमरालाजवळ मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. लग्नाचे वर्हाड घेऊन हा ट्रक राजकोट-भावनगर महामार्गावरून निघाला होता. या ट्रकमध्ये जवळपास 60 वर्हाडी होते. समोरून येणार्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून नाल्यात कोसळला. या अपघातात 30 वर्हाडी जागीच ठार झाले. तर 30 जण जखमी झाले आहेत.