वलठाण परीसरात उस व कपाशीवर रोग आल्याने शेतकरी चिंतेत

0

चाळीसगाव – तालुक्यातील वलठाण परीसरात उस व कपाशी पिकावर करपा व तुडतुडे रोगाची लागण झाली असुन यामुळे उत्पन्न कमी होवुन नुकसान होणार असल्याने शेतपिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे. सध्या पावसाळा सुरु असला तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला येणाऱ्या उत्पन्नावर फरक पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असताना उस व कपाशी पिकावर तालुक्यातील वलठाण परीसरात करपा व तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होवुन मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतपिकांचा पंचनामा होवुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. आज तालुक्यातील वलठाण येथील सरपंच संजय राठोड, रिपाइंचे तालुका अध्यक्ष कैलास सूर्यवंशी, पोलीस पाटील हरीचंद चव्हाण, शेतकरी अजय राठोड, शिवदास राठोड, राजमल राठोड, विकास त्रिभुवन, भारमल राठोड यांनी शेतात जावुन कपाशी व उसाची पाहणी केली.