जळगाव । स्लॅबचे काम आटोपून जामनेरकडे पॅजो रिक्षाने मजूरांसह जात असतांना देवपिंप्री-गोडखेड येथे वळणावर वाहनाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. रिक्षा पलटी झाल्याने रिक्षा चालकासह इतर चौघेजण गंभीर जखमी झाले असून चौघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद प्रताप चव्हाण (वय-25) रा. खडकी ता.जामनेर हे देवपिंप्री येथे स्लॅबचे काम करण्यासाठी मजूरांसह अॅपे रिक्षाने गेले होते. रिक्षाचे काम आटोपून मजूरांसह घरी परतत असतांना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास देवपिंप्री-गोडखेड दरम्यान असलेल्या वळणावर रिक्षा चालक विनोद चव्हाणचा ताबा सुटल्याने मागे बसलेले विलास मदन चव्हाण, विनोद ताराचंद चव्हाण, ज्ञानेश्वर खरीचंद राठोड सह एकजण जखमी रिक्षातून खाली पडले. यात चौघेजण जखमी झाले तर रिक्षाचालक विनोद चव्हाण यांच्या छातीवर व पोटावर रिक्षाची पुर्ण बॉडी आल्याने गंभीर जखमी झाला. रस्त्यावरील नागरिकांनी 108 क्रमांकाला फोन लावून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.