शहादा
येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘स्पंदन ‘ नावाच्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले
या भित्तिपत्रकाचे विषयानुसार वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे.प्रत्येक विषयाची नाविण्यपूर्ण माहिती संकलीत करून लावण्यात येणार आहे.म्हणजे विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती मिळावी व त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी हा दृष्टिकोन समोर ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी भित्तिपत्रकात इंग्रजी विषयापासून सुरुवात करण्यात आली.यात माइंड माॅपिंग, इंग्रजी साहित्याचा इतिहास, इंग्रजी विषयाचे महत्त्व अशी वेगवेगळी माहिती संकलित केली.माहिती संकलित करण्यासाठी सैय्यद मुस्कान,कोळी प्रतिक्षा, ठाकरे अस्मिता, पाटील धनश्री,शिरसाठ या विद्यार्थिनींनी परीश्रम घेतले.त्यांच्या कार्याचे संस्थेकडून व शाळेकडून कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा अशोक वळवी यांनी केले