वसई । काल जगासह संपूर्ण देशातील विविध राज्यात सगळीकडे रंगपंचमी जोरदार साजरी करण्यात आली होती. वसईत ही सर्वत्र रंगपंचमीच्या सणाला कोठेही गालबोट लागू नये म्हणून सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी सातही पोलीस स्टेशनच्या परिसरात नाकाबंदी करून 173 मोटार सायकल, 61 ड्रकं अँड ड्राईव्ह व 9 धिंगाणा घालणार्यावर केसेस करण्यात आल्या असून मोटार सायकली जप्त केल्या असून वसई न्यायालयात दंड भरून आल्यानंतर मोटार सायकली सोडणार आहे. तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांनीही जोरदार बंदोबस्त लावून विविध ठिकाणी नाकाबंदी करत 74 ड्रकं अँड ड्राईव्ह, 91 ट्रिपल सीट, 491 मोटार सायकलीवर केसेस करून 1 लाख 1 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वसई तालुक्यातील सातही पोलीस स्टेशनच्या परिसरात सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी गालबोट लागू नये म्हणून कंबर कसली होती.
रंगपंचमीच्या पहाटे पासून सर्वच जागी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवला होता. नालासोपारा पोलिसांनी सिव्हिक सेंटर, धनंजय नाका, वाघोली नाका येथे बंदोबस्तादरम्यान 40 मोटार सायकली विनापरवाना चालविणार्यावर, 14 ड्रॅकं अँड ड्राईव्हच्या केसेस आणि 5 धिंगाणा घालणार्यावर केसेस केल्या आहे.