वसतिगृहात राहणारा विद्यार्थी बेपत्ता

0

तळेगाव दाभाडे : वसतिगृहात राहणारा विद्यार्थी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पवन मुरलीधर जठार (वय 20, रा. तोलानी कॉलेज) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन इंदोरी येथील तोलानी कॉलेज येथे मेरीटाईम इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षात शिकत आहे. शनिवारी पवन याची परीक्षा होती. त्या परीक्षेसाठी तो अनुपस्थित राहिला. त्यानंतर दुपारी पाच वाजता झालेल्या काउंटिंगमध्ये देखील अनुपस्थित राहिला. त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याची शोधाशोध केली. रात्री दहा वाजता झालेल्या काउंटिंगमध्ये देखील तो अनुपस्थित राहिला. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने पवनच्या पालकांना याची माहिती दिली. त्यावर तात्काळ त्याच्या वडिलांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पवनने जांभळ्या रंगाचा टी शर्ट, फुल स्वेटर, काळ्या रंगाची बॅग, निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, नाकाच्या समोरील बाजूला चार टाक्यांची जुन्या जखमेची खूण, रंग सावळा, उंची पाच फूट सहा इंच, सडपातळ बांधा असून तो मराठी भाषा बोलतो. वरील वर्णनाचा तरुण मुलगा आढळल्यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.