शहादा। शहरातील नवीन वसाहतीत रहाणार्या नागरिकाना विविध समस्याना सामोरे जावे लागते आहे. शहरातील डोंगरगाव रोड लगत असलेल्या नवीन वसाहती शारदा नगर,तुलसी नगर, पतंजली नगर,स्वामी समर्थ नगर आदि वसाहतीत सर्वात महत्वाच्या प्रश्न म्हणजे गटारी नाहीत. नगरपालिकेने सर्वाना शौष खडडा बनविण्यास भाग पाडले.परंतु हे खड्डे दोन वर्षात भरुन जातात अशी नागरिकांची तक्रार आहे.त्याला पूर्णपणे गाळसहीत काढण्यासाठी नगरपालिकेकडुन व्यवस्था नाही.केवळ पाणी काढले जाते.त्यामुळे गाळ साफ होत नसल्याने पुन्हा पुन्हा शोष खड्डा भरतो व त्याच्या आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
कूपनलिका कोरड्या,पाण्यासाठी वणवण
नवीन वसाहतीत लोकांनी गरजेनुसार कूपनलिका तयार करुन घेतल्या मात्र नगरपालिकेला या वसाहतीत पाणी का सोडत नाही या बाबत संशय व्यक्त केला जात आहे. कहर म्हणजे पावसाने पाठ फिरवली आहे त्यामुळे जमीनीच्या पाण्याचा पातळी खोलवर गेली आहे. तर काही कूपनलिका कोरड्या झाल्या आहेत त्यामुळे या वसाहतीतील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे.
पाण्याच्या टँकरची सोय नाही
नगरपालिकेने या वसाहतीकडे व्यवस्थीत लक्ष देवुन एक तर झालेल्या पाईप लाईनीत पाणी आणून सोडावे अथवा तात्पुरत्या अवस्थेत पाण्याच्या टँकरची सोय केली पाहिजे असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक या बाबत गांभीर्याने दखल घेतील अश्या प्रतीक्षेत वरील सर्व वसाहतीमधील नागरिक आहेत.
घंटा गाडी नियमित येत नसल्याच्या तक्रारी
त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यात गोविंदनगर भागात घंटा गाडी नियमित येत नसल्याच्या तक्रारी आहेत.डोंगरगाव रोड लगत असलेल्या नवीन वसाहतीत पाण्यासाठी नवीन पाईपलाईन केली गेली आहे दोन वर्षापासून नागरिकांनी नळ जोडणी करुन घेतली आहे.शुध्द पाणी मिळ्णार याची आतुरतेने वाट पहात दोन वर्ष लोटली गेलीत परंतु नळ्याना एक थेंब पाणी आले नाही ते मृगजळ ठरले. नगरपालिका पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळाले पाहिजे हा त्यांच्या हक्क आहे.