वस्तू आणि कर कायद्यामुळे देशाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार – रामदास आठवले

0

मुंबई | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक देश एक कर या साठी नव्याने आणलेला वस्तू आणि कर (जीएसटी) या कायद्यामुळे देशाचा वेगवान विकसासाठीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. जीएसटी मुळे देशाची प्रगती होण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

काही लोक जरी जीएसटीचाविरोध करीत असले तरी लवकरच सर्व विरोधक सुद्धा जीएसटीचे समर्थन करतील, असा दावा रामदास आठवले यांनी केला. ते मुंबईत हॉटेल लीला येथे आयोजित झालेल्या वर्ल्ड आचिवर्स अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

उद्योग व्यावसायासोबतच सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन देशसेवा करणाऱ्या उद्योजकांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसैन यांच्या हस्ते वर्ल्डवाईड आचिवर्स अवॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर तसेच अभिनेते राकेश बेदी आदी उपस्थित होते.