वांजोळा गावात श्रमदानातून उभारला बंधारा

0

आमदार संजय सावकारेंसह जि.प.सदस्य पल्लवी सावकारेंचे श्रमदान

भुसावळ (प्रतिनिधी)- तालुक्यातील वांजोळा येथे कृषी विभाग व गावकर्‍यांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे कार्य हाती घेतले आहे. आमदार संजय सावकारे यांच्यास जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी सोमवारी सहभाग नोंदवून ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. वांजोळा गावातील ग्रामस्थांनी गावालगतच्या वनराईमध्ये बंधारे निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले असून सोमवारपासून या कार्याला सुरूवात झाली.

यांची होती उपस्थिती
लोकसहभागातून वनराई बंधारा खोल सलग समतल चर खोदून तयार करण्यात आला. याकरीता सर्व वांजोळा ग्रामस्थ व आमदार संजय सावकारे, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, कृषी विभागाचे श्रीकांत झांबरे, भारंबे, तालुका सरचिटणीस नारायण कोळी यांच्यासह सर्व कृषीसेवक, तालुका सरचिटणीस नारायण कोळी, वांजोळा सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच भुषण कोळी, किरण चोपडे, संजय तायडे, हरीष पाटील, जगदीश दोडे, संजय तायडे यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी मनोगत व्यक्त करतांना वनराई बंधारे हे प्रत्येक गावात शासकीय मदतीवर न विसंबून राहता श्रमदानातून लहान मोठे बंधारे तयार करणे आवश्यक असून कृषी विभागाकडून बंधार्‍यांच्या कामासाठी आवश्यक मदत देण्याचे आश्‍वासन दिले.