वांजोळा येथे उज्वला गॅस योजनेंतर्गत 42 लाभार्थींना गॅस संचाचे वाटप

0

जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

भुसावळ- तालुक्यातील वांजोळा येथे जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान उज्वला गॅस योजनेंतर्गत 42 लाथार्थींना गॅस संचाचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिी सभापती प्रीती पाटील, उपसभापती मनिषा पाटील, जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, राजपथ क्लासेसचे संचालक हृषिकेश पवार, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच देविदास सावले, ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

धुरापासून मुक्ती ; शासन योजनांचा घ्यावा लाभ -आमदार
आमदार संजय सावकारे यांनी मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हेतू स्पष्ट केला व चूल पेटवल्याने विविध आजाराची बाधा गरीबांना होत होती. धूरापासून आपणास आता मुक्ती मिळणार आहे तसेच गावकर्‍यांनी प्रत्येक योजनेत सहभाग घेत शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. योजना प्रत्येक घटका पर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे परंतु या प्रयत्नात आपण सर्वांनी प्रतिसाद दिल्यास निश्चितच उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास यावेळी आमदार सावकारे यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन शेंडे यांनी कले तर आभार देविदास सावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून सरपंच नरेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत राबवित असलेल्या लोकोपयोगी उपक्रमांची माहिती दिली व उज्वला गॅस लाभार्थ्यांची यादी जाहीर करून गरीब जनतेच्या जीवनात अंधाराकडून उजेडाकडे नेण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.पंकज पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, उज्वला गॅस योजना ही एक प्रशंसनीय योजना आहे. जी आज घराघरात अंधकारकडून प्रकाशाकडे नेत आहे. यास ग्रामपंचायत यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करत असल्याने ते म्हणाले.