वांजोळा रोड परिसरात गावठी दारु अड्ड्यावर धाड

0

भुसावळ। वांजोळा रोड परिसरात सुरु असलेल्या गावठी दारुच्या अड्ड्यावर तालुका पोलीस स्थानकाच्या पथकाने सकाळी 8 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करीत गावठी दारु बनविण्याचे साहित्य तसेच तयार केलेला 53 हजार 800 रुपयांचा माल पोलिसांनी जागीच नष्ट केला.

तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई
सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस अधिक्षक कलवानीया यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहाय्यक फौजदार सुरेश वैद्य, पोलिस नाईक रियाज शेख, गजानन काळे यांंनी दारुबंदी कायद्यांतर्गत कारवाई केली. यामध्ये मिळाला 20 हजार 900 रुपयांचे चार दगडी चुलीची भट्टी त्यात लाकडे, 200 लिटर मापाचे चार पत्री ड्रम त्यामधे 800 लिटर गुळ, नवसागर मिश्रीत उकळते रसायन, 70 लिटर तयार दारु तसेच दुसर्‍या ठिकाणी 28 हजार रुपयांचा माल नष्ट करण्यात आला यात 200 लिटर मापाचे 8 पत्री ड्रम, 1 हजार 600 लिटर गुळ, नवसागर मिश्रीत कच्चे रसायन तसेच याला लागूनच असलेल्या भट्टीवर 4 हजार 900 रुपयांचे 2 प्लॅस्टीकच्या कॅन त्यात प्रत्येकी 35 लिटर दारु अशी एकुण 70 लिटर गावठी हात भट्टीची तयार दारु नष्ट करण्यात आली.