वाईन शॉप बाहेरील जाहिरात १५ दिवसात काढावे

0

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉपबाहेरील लिकर ब्रँड्स, फ्लेक्स, निऑन साईनबोर्ड हटवण्याचे आदेश दिले आहेत. वाईन शॉप्सच्या दरवाजाबाहेरील सर्व जाहिराती येत्या 15 दिवसात काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुकानाचं नाव असलेला 60X90 सेमी आकाराचा फलकच वाईन शॉपबाहेर लावता येणार आहे. त्यावर नावासोबत परवाना क्रमांक, पत्ता आणि दुकान सुरु-बंद होण्याची वेळ इतकेच तपशिल देता येतील.

कुठल्याही लिकरचा ब्रँड किंवा जाहिरातींचे फलक वाईन शॉपबाहेर लावता येणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केलं आहे. परदेशी लिकर परवाना धारक पाचव्या नियमाचं उल्लंघन करत असल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.