जळगाव । जामनेर तालुक्यातील वाकडी गावात 10 जून रोजी जमिनदार ईश्वर बळवंत जोशी व त्यांच्या सालदाराने मातंग समाजातील दोन मुलांना विवस्त्र करुन पट्ट्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील दोन तरुणांवर अत्याचार केल्याप्रकरणी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे मांग-मातंग समाज जोडणारे व्हा! अभियान यांच्यातर्फे आज पांडे डेअरी चौकातून स्वातंत्र्यचौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत जय लहूजी उस्ताद, जय फुले, जय शाहू अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र जमून उपस्थितांमधील प्रतिष्ठीत व्यक्तींनी जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
संघटनेच्या या आहेत मागण्या
जामनेर तालुक्यात वडकी गावात 10 जून रोजी ईश्वर जोशी व त्यांचा सालदाराने मातंग समाजातील 2 किशोरवयीन मुलांना विवस्त्र करुन पट्ट्याने बेदम मारहाण केल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण होऊन अत्याचार विषयी जाहिर निषेध केला. जाती द्वेष व जाती विषमता नष्ट करण्यासाठी शासनाने निती निर्देशक तत्वाप्रमाणे अंमलबजावणी करावी. अनुसूचित जातींना मान देऊ शकत नाही ती समाजव्यवस्था बदललीच पाहिजे. घटनेनुसार समता प्रस्थापित करुन जाती नष्ट झालीच पाहिजे. अत्याचार करणार्याची मिलकीती व स्थावर मालमत्ताचा दहावा भाग पुनर्वसनसाठी मिळालाच पाहिजे. न्याय- प्रक्रिया ईमानदारी व निष्ठेने पार पाडलीच पाहिजे आणि जाती अवधारणेला नष्ट करण्यासाठी कडक कायदा झालाच पाहिजे.
यांची होती उपस्थिती
संघटनेचे अध्यक्ष रमेश साठे, सचिव गणेश शिरसाठ, कैलास चैंदणे, आनंदा तांबे, मंगला चैंदणे, उषा तांबे, मिरा शिरसाठ, वैजयंता तांबे, कल्पना खरात, सागर बाविस्कर, विकास तांबे, सरिता मोरे, सुनिल शिरसाठ, गणेश गायकवाड, भूषण चैंदणे, अजय सोडसे, जगन सपकाळे, अशोक तांबे, संदीप भालेराव यांच्या संघटनेचे पदाधिकारी, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.