अमृत योजनेच्या कामास सुरूवात
थेरगाव : वाकड मधील दक्षतानगर, कस्पटेवस्ती येथे अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या 160 मी.मी. व्यासाचे पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी कामाचा प्रारंभ करण्यात आला. यामुळे वाकड परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
मोठ्या आकाराच्या वाहिन्या
या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या होती. येथील पाईपलाईन जुनी असल्या कारणाने या ठिकाणी पाणी कमी दाबाने येत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत होती. याबाबत नागरिकांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्याकडे या संदर्भात तक्रार मांडली होती. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत गायकवाड यांनी पाणीपुरवठा विभागाशी पाठपुरावा केला. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरळीत करावा. जोपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागास दिले होते. गेले काही दिवस या परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू होता. आज अमृत योजने अंतर्गत 160 मी.मी. व्यासाचे पाईप टाकून या कामास सुरुवात करण्यात आली.