पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ वाकड, पिंपळे निलख मधील वेणूनगर येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या कामाचा शुभारंभ नगरसदस्य
संदीप कस्पटे व नगरसदस्या आरती चोंधे यांच्या हस्ते झाला. आज ( शनिवारी) दुपारी झालेल्या या कार्यक्रमास माजी नगरसदस्य विनायक गायकवाड, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, जेष्ठ नागरिक अशोक पवार, मधुकर रहाटे, अशोक पिंगळे, अरुन देशमुख, वाणी, पांडकर आदी उपस्थित होते.
या ठिकणी सुमारे १० गुंठे जागेवर प्रशस्त असे विरंगुळा केंद्र बांधण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये खर्च होणार आहे. विरंगुळा केंद्रात लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची व्यवस्था करण्यात येणार असून नागरिकांसाठी ओपन जिम, स्वतंत्र गझेबो तसेच उद्यानात अंदाजे २०५ मिटर लांबीचा व १.८मिटर रुंदीचा ट्रिमिक्स पाथवे तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.