वाकड : राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून ग्राहक व शेतकरी यांना जोडणार्या शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले. याचे उदघाटन ज्येष्ठ नागरिक, महिला व नगरसेवक मयुर कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार किफायतशीर किंमतीमध्ये ताजा भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या आठवडे बाजारातून उपलब्ध करण्यात येणार असणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले. दर शुक्रवारी सायंकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये येथील चौधरी पार्क परिसरात हा शेतकरी आठवडे बाजार भरणार आहे.
यावेळी युवा नेते सुनील भुमकर, राजाभाऊ विनोदे, अविनाश ताकटे पाटील, भास्कर गायकवाड, विशाल कलाटे, साकी गायकवाड, जगन्नाथ भुजबळ, सुनील धसाळ प्रताप निंबाळकर, मुकेश सोनोने, अनिल कुंभार, विजय चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.